महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मतदार समर्थनावरील परिणाम: एक अभ्यास

लेखक

  • प्रा. श्रीमती. बैनवाड स्वाती प्रकाश Author

    शोधशब्द:

    लाडकी बहिण योजना, कल्याणकारी धोरण, महिला सक्षमीकरण, मतदार वर्तन, महाराष्ट्र

    गोषवारा

    भारतामध्ये सामाजिक कल्याणकारी योजनांचा सामाजिक-आर्थिक विकासात तसेच नागरिकांच्या राजकीय वर्तनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असल्याचे विविध संशोधनांमधून दिसून आले आहे. वेळोवेळी राज्य सरकार व केंद्र सरकार गरीब आणि वंचित गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवतात. महाराष्ट्र सरकारने २०२४ मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रु. १५०० इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते.

    या संशोधनाचा उद्देश या योजनेचा महिलांच्या आर्थिक स्थितीवर तसेच त्यांच्या राजकीय दृष्टिकोन आणि मतदानाच्या वर्तनावर होणारा प्रभाव अभ्यासणे हा आहे. या अभ्यासासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील 200 महिलांकडून माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. तसेच दुय्यम माहिती सरकारी अहवाल, संशोधन लेख आणि वृत्तपत्र स्त्रोतांमधून संकलित करण्यात आली.

    सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार 94 टक्के महिलांना या योजनेबद्दल माहिती होती आणि 70 टक्के महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत होता. 60 टक्के महिलांनी या योजनेमुळे सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे नमूद केले. ची-स्क्वेअर चाचणी, सहसंबंध आणि प्रतिगमन विश्लेषणाच्या निकालांवरून असे दिसून आले की, योजनेचा लाभ आणि राजकीय समर्थन यांच्यात सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संबंध आहे.

    या अभ्यासातून असे निष्कर्ष काढता येतात की, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा मतदारांच्या वर्तनावर जास्त प्रभाव पडतो. तथापि मतदानाच्या निर्णयावर इतर सामाजिक आणि राजकीय घटकांचाही प्रभाव असला तरी या प्रकारच्या योजना मतदान निर्णय घेण्यावर प्रभावी परिणाम करतात.

    लेखकाचे जीवनवृत्त (Biography)

    • प्रा. श्रीमती. बैनवाड स्वाती प्रकाश

      राज्यशास्त्र विभाग प्रमुख, तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र-भारत

    संदर्भ

    १. Barrett, Edith J., and Fay Lomax Cook. "Congressional attitudes and voting behavior: An examination of support for social welfare." Legislative Studies Quarterly (1991): 375-392.

    २. Baez, Javier, et al. "Conditional cash transfers, political participation, and voting behavior." (2012).

    ३. Goyal, Ankush, and Rajender Kumar. "Does social welfare programmes influence households trust in local administration and their political participation? Evidence from the MGNREG scheme in India." Indian Journal of Human Development 16.3 (2022): 602-617.

    ४. Samanta, Suteertha, and Aritra Chakraborty. "Gender and Populism: How Do Welfare Schemes Influence the Voting Behaviour of Women in Contemporary West Bengal?." Journal of South Asian Development (2026): 09731741261418383.

    ५. Ambedkar_Ovhal, Vishal Vishnu, and Rani Shinde. "Impact of mukhyamantri mazi ladki bahin yojana on women in Maharashtra: An analytical study." International Journal of Management (IJM) 16.1 (2025).

    ६. Deshpande, Rajeshwari, Louise Tillin, and K. K. Kailash. "The BJP’s welfare schemes: Did they make a difference in the 2019 elections?." Studies in Indian Politics 7.2 (2019): 219-233.

    ७. Maitra, Pushkar, et al. Declining Clientelism of Welfare Benefits? Targeting and Political Competition Based Evidence from an Indian State. No. w32157. National Bureau of Economic Research, 2024.

    ८. Bardhan, Pranab, et al. "How do voters respond to welfare vis‐à‐vis public good programs? Theory and evidence of political clientelism." Quantitative Economics 15.3 (2024): 655-697.

    ९. https://ladakibahin.maharashtra.gov.in/

    १०. https://pune.gov.in/en/scheme/mukhyamantri-majhi-ladki-bahin-yojana/

    डाउनलोड्स

    प्रकाशित

    2026-04-05

    अंक

    विभाग

    Articles

    प्रवर्ग (Categories)

    उद्धरणे कशी द्यावीत

    महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मतदार समर्थनावरील परिणाम: एक अभ्यास. (2026). Aethel Research Digest Juncture: An International Journal, 2(01), 39-56. https://ardjij.com/index.php/ardjij/article/view/26