खाजगी व सरकारी शिक्षणावरील खर्चाचा कौटुंबिक उत्पन्नाशी संबंध : एक अभ्यास
Main Article Content
गोषवारा
https://doi.org/10.5281/zenodo.20035403
शिक्षण हा मानवी विकासाचा पाया आहे, परंतु अलिकडच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण आणि वाढता खर्च ही पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. मराठवाडा सारख्या विकसनशील क्षेत्रात पालकांच्या उत्पन्नाचा त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि शाळा निवडीवर (सरकारी की खाजगी) मोठा प्रभाव पडतो. सदरील अभ्यासामध्ये मराठवाड्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण स्तरांवरील खाजगी व सरकारी खर्चाचा कुटुंबाच्या उत्पन्नाशी असलेला संबंध तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हा अभ्यास अनुभवाधारित, वर्णनात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. या मध्ये १०० कुटुंबांची गुगल फोर्म च्या मदतीने माहिती गोळा केली आहे. तसेच दुय्यम माहिती सरकारी सरकारी अहवाल, शिक्षण विभागाची आकडेवारी, संशोधन लेख इ. द्वारे माहिती गोळा केली आहे. याच्या आधारे कुटुंबाचे उत्पन्न आणि शैक्षणिक खर्च शिक्षणावरील खर्च यांच्यात कोणताही महत्त्वपूर्ण संबंध आहे, हे तपासण्यासाठी सहसंबंध आणि रेषीय प्रतिगमनाच्या मदतीने विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासातून स्पष्ट होते कि कुटुंबाचे उत्पन्न आणि शिक्षणावरील खर्च यांचा खूप जवळचा साकारात्मान संबंध आहे. शासकीय शाळांच्या संख्येत घट होत असून खाजगी शाळांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येते. यामुळे समाजात विषमता वाढण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्काची व्याप्ती वाढवणे, सरकारी शाळाच्या विकासास महत्व देणे, सरकारी इंग्रजी व सेमी-इंग्रजी शाळा उभा कराव्यात इत्यादी वर भर द्यावी असे हा अभ्यास स्पष्ट करते.
(मुख्य शब्द:शैक्षणिक खर्च, शिक्षण स्तर, कुटुंबाचे उत्पन्न, खाजगी शिक्षण, शिक्षणाचा हक्क, सामाजिक विषमता इ. )
Downloads
Article Details
विभाग

हे लेखन Creative Commons Attribution 4.0 International License अंतर्गत परवानाकृत आहे.
"All articles published in 'Aethel Research Digest Juncture: An International Journal (ARDJIJ)' are licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License (CC BY 4.0). This permits anyone to copy, redistribute, remix, transmit and adapt the work provided the original work and source is appropriately cited. Authors retain the copyright of their work and grant the journal the right of first publication."
उद्धरणे कशी द्यावीत
संदर्भ
1. Qian, Joanne Xiaolei, and Russell Smyth. "Educational expenditure in urban China: Income effects, family characteristics and the demand for domestic and overseas education." Applied Economics 43.24 (2011): 3379-3394.
2. Deshmukh, A. (2018). Income Growth and Household Education Expenditure: Evidence from Indian Households. Journal of Education Economics, 12(3), 45–59.
3. Panda, Sitakanta. "Farmer education and household agricultural income in rural India." International Journal of Social Economics 42.6 (2015): 514-529.
4. Patil, S. (2020). Comparative Analysis of Annual Educational Costs in Private and Public Schools in India. International Journal of Educational Finance and Policy, 8(2), 78–94.
5. Sheikh, Younis Ahmad. "Higher education in India: Challenges and opportunities." Journal of Education and Practice 8.1 (2017): 39-42.