आनंद यादव यांच्या कादंबऱ्यातील स्त्री चित्रणाचा एक अभ्यास
Main Article Content
सार
प्रा. डॉ. आनंद यादव यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील स्त्रीचित्रणाचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे. आनंद यादव यांच्या ग्रामीण व आत्मचरित्रपर लेखनातून तत्कालीन ग्रामीण समाजजीवन, स्त्रियांचे दुःख, दारिद्र्य, सासुरवास, पुरुषी वर्चस्व, कौटुंबिक अन्याय आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाचे वास्तववादी चित्रण दिसून येते. प्रस्तुत अभ्यासात ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ आणि ‘नटरंग’ या कादंबऱ्यांतील स्त्री व्यक्तिरेखांचा विशेष विचार करण्यात आला आहे. ‘झोंबी’मध्ये तारा, आकणी व इतर स्त्रियांच्या माध्यमातून स्त्रीला सहन करावा लागणारा कौटुंबिक छळ व सासुरवास, ‘नांगरणी’मध्ये घोडाबाईच्या माध्यमातून स्त्रीच्या विवाहविषयक स्वातंत्र्याचा अभाव, तर ‘घरभिंती’मध्ये सुंदरा व हिराबाई यांच्या माध्यमातून स्त्रीजीवनातील शारीरिक व मानसिक यातना अधोरेखित झाल्या आहेत. ‘नटरंग’मधील दारकीच्या व्यक्तिरेखेतून कलाकाराच्या पत्नीला भोगावा लागणारा सामाजिक अपमान, दारिद्र्य, लैंगिक शोषण आणि कौटुंबिक संघर्ष यांचे चित्रण झाले आहे. या सर्व स्त्री व्यक्तिरेखा विशिष्ट कुटुंबातील असल्या तरी त्या तत्कालीन ग्रामीण समाजातील स्त्रियांच्या व्यापक दुःखांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आनंद यादव यांच्या कादंबऱ्यांतील स्त्रीचित्रण हे ग्रामीण स्त्रीजीवनातील विषमता, अन्याय आणि संघर्ष यांचे वास्तवदर्शी प्रतिबिंब ठरते.
Downloads
Article Details
खंड

This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
"All articles published in 'Aethel Research Digest Juncture: An International Journal (ARDJIJ)' are licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License (CC BY 4.0). This permits anyone to copy, redistribute, remix, transmit and adapt the work provided the original work and source is appropriately cited. Authors retain the copyright of their work and grant the journal the right of first publication."
How to Cite
References
१. साहित्यिक आनंद यादव डॉ रवींद्र ठाकूर बळीवंश प्रकाशन नांदेड, प.आ. २०११ पृ. क्र.१७.
२. झोंबी आनंद यादव पृ. क्र.१.
३. झोंबी' आनंद यादव पृ क्र. १२८.
४. 'झोंबी-आनंद यादव पृ क्र १२०
५. 'नांगरणी' आनंद यादव पृ क्र २२७
६. 'नांगरणी- आनंद यादव पृ क्र २२०
७. घरभिंती' आनंद यादव पृ. क्र. १७
८. 'घरभिंती' आनंद यादव पृ. क्र.७४
९. 'नटरंग' - आनंद यादव पृक्र ७५
१०. 'नटरंग' - आनंद याइय पृ. क्र. १६६
११. 'नटरंग' - आनंद यादव पृ.क. १८४